Menu Close

विरार येथे साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी

मंदिर सरकारीकरण, भ्रष्टाचार, आतंकवाद्यांच्या धमक्या यांनंतर आता मंदिरांतील वाढत्या चोर्‍यांची प्रकरणे, हे हिंदूंची श्रद्धास्थाने असुरक्षित असल्याचेच द्योतक आहे. हिंदूंनो, आतातरी जागृत होऊन सर्वार्थाने सुरक्षित वातावरण अनुभवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

विरार (पालघर) : येथील गजबजलेल्या परिसरातील प्रसिद्ध साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी झाली आहे. १९ मे या दिवशी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंदिरातील पुजारी मंदिर उघडून दुसर्‍या कामात व्यस्त असतांना चोरांनी पादुका चोरून विजारीमध्ये (पॅन्टमध्ये) लपवल्या. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही घटना चित्रीत झाली असून याविषयी अधिक अन्वेषण चालू आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *