Menu Close

अमरावती येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सामूहिक मंदिर स्वच्छता आणि साकडे

मंदिराची स्वच्छता करतांना धर्मप्रेमी
मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी

अमरावती : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथील ४ मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. तसेच एकूण १३ ठिकाणी हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी विविध मंदिरांसह शहरातील प्रसिद्ध चांगापूर या मारुति देवस्थानात साकडे घालण्यात आले. या उपक्रमांत धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमी महिला आणि सनातन प्रभातचे वाचक यांनी सहभाग घेतला.

धर्मप्रेमींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

१. मंदिर स्वच्छतेमुळे मंदिरात चैतन्य जाणवत आहे. असे उपक्रम नियमित व्हायला हवेत. – सौ. वाघ, अमरावती

२. हिंदु राष्ट्र-जागृतीचा उपक्रम स्तुत्य असून ही काळाची आवश्यकता आहे. – एक धर्मप्रेमी

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *