Menu Close

यवतमाळ : ‘हिंदु-राष्ट्रा’च्या निर्मितीसाठी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला साकडे !

कारंजा येथे साकडे घालतांना धर्मप्रेमी

यवतमाळ : भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, भारतियांमध्ये सनातन हिंदु धर्मातील नैतिक मूल्ये आचरण करण्याची वृत्ती निर्माण व्हावी, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्‍या सर्व हिंदु धर्मप्रेमींचे आपत्काळात रक्षण व्हावे, तसेच त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होऊन त्यांची लवकर आध्यात्मिक उन्नती व्हावी यांसाठी यवतमाळ आणि कारंजा येथे हिंदु नववर्षाच्या निमित्ताने सामूहिक प्रार्थना करण्यात आली. श्रीराम मंदिर तिवारी चौक, यवतमाळ येथे श्री. दत्तात्रय फोकमारे यांनी सामूहिक प्रार्थना घेतली. या वेळी ४० जण उपस्थित होते. श्रीराम मंदिर, कारंजा येथे श्री. संतोष पारसवार यांनी सामूहिक प्रार्थना घेतली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *