Menu Close

धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाईल : भय्याजी जोशी

पुणे : देशाची हानी ही सज्जन शक्तीच्या निष्क्रीयतेनेच झाली आहे. हीच निष्क्रीयता झटकून हिंदु समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले. स्नेहल प्रकाशनच्या वतीने रामकृष्ण पटवर्धनलिखित ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन’ पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, धर्माचे रक्षण करण्यासाठी संघ विचार महत्त्वाचा आहे. समाज कालप्रवाहात जागृत राहिला नाही तर काय होते, याचे उदाहरण म्हणजे भारत आहे. विचार विमानातून चालला आहे आणि आचरण बैलगाडीतून चालले आहे, असे होता कामा नये. एक निर्दोष समाज उभा करायचा आहे. समाजातील दोष दूर करण्यासाठी पुरुषार्थ निर्माण केला पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *