Menu Close

दिल्ली : कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन

प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

नवी देहली : हिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते. २९ वर्षे पूर्ण झाली, तरी अजून काश्मीरमधील विस्थापित हिंदू त्यांच्या घरी परत जाऊ शकले नाहीत. विस्थापित हिंदूंना न्याय देण्यास सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. काश्मीरमधील विस्थापित हिंदूंना आजही निर्वासित छावण्यांमध्ये जीवन जगावे लागत आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आणि हिंदूंना जागृत करण्यासाठी पनून काश्मीरनिर्मित ‘फॅक्ट’ प्रदर्शन लावण्यात आले होते. अनुमाने ५०० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रदर्शनाचे छायाचित्रांकन केले.

२. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयी माहिती देणारे ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *