Menu Close

राममंदिर उभारण्याच्या हिंदूंच्या मागणीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागेल : जगद्गुरु हंसदेवाचार्य

कुंभ मेळा प्रयागराज २०१९

प्रयागराज (कुंभनगरी) : राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अथवा अध्यादेश काढावा, असे प्रतिपादन जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्य महाराज यांनी ११ जानेवारीला येथे केले. ते म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने ‘राममंदिराचे सूत्र आमच्या प्राथमिकतेत नाही’, असे सांगून ३ मिनिटांच्या सुनावणीत पुढील ३ मासांची दिनांक दिली आहे. याविषयी न्यायालयात प्रतिदिन सुनावणी व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे; मात्र न्यायालयाच्या या भूमिकेमुळे साधू-संतांनी आंदोलन चालू केले. अखिल भारतीय संत समितीने देहलीत धर्मसभा घेऊन सरकारकडे राममंदिर उभारण्याची मागणी केली. सर्वांचा सरकारवर दबाव आहे. त्यामुळे सरकारला या सर्वांपुढे झुकावेच लागेल.’

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *