Menu Close

राममंदिर होण्यासाठी नागपूर येथे हिंदु संघटना २५ नोव्हेंबरला ‘हुंकार फेरी’ काढणार !

नागपूर : राममंदिरासाठी पुन्हा आंदोलन करण्याची चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्यानंतर आता या आंदोलनासाठी मोर्चेबांधणीही चालू झाली आहे. १० नोव्हेंबरला सकाळी येथील संघ मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे येथील नगरसेवक, आमदार यांच्यासह संघाशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधी मिळून ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. राममंदिरासाठी संघाच्या वतीने ‘हुंकार फेरी’चे आयोजन केले जाणार आहे. पहिली हुंकार फेरी येथेे २५ नोव्हेंबरला होणार आहे. साध्वी ऋतंभरा आणि अन्य मंडळी या ‘हुंकार फेरी’तील प्रमुख वक्ते असतील, असेही समजते. नागपूरप्रमाणेच देहली आणि बेंगळूरू येथेही हुंकार फेरीचे आयोजन केले जाईल आणि शेवटची ‘हुंकार फेरी’ अयोध्येत होण्याची शक्यता आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *