Menu Close

नंदुरबार : श्री शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

नंदुरबार : व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार  केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर डोळा ठेवूनच हे कृत्य केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांसमवेतच अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळेही सरकार का कह्यात घेत नाही ?’, असा प्रश्‍न येथील नेताजी सुभाष चौकात २२ जुलै या दिवशी आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांकडून उपस्थित करण्यात आला. भर पावसातच हे आंदोलन पार पडले.

या वेळी नंदुरबार येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. दिलीप ढाकणे-पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतीश बागुल, जितेंद्र राजपुत, राजु चौधरी, मयुर चौधरी, आशिष जैन, सौरभ पंडित, पंकज डाबी, जितेंद्र मराठे, गणेश राजपुत, जय पंडित, आकाश गावित उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *