Menu Close

आम्ही सदैव हिंदु जनजागृती समितीच्या पाठीशी आहोत : पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. संभाजी भिडेगुरुजी यांना दैनिक सनातन प्रभातचा अंक दाखवतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल

धुळे : आम्ही सदैव हिंदु जनजागृती समितीच्या पाठीशी आहोत, असे आश्‍वासक उद्गार श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले. ते २८ मे या दिवशी धुळे येथे आले होते. वास्तुविशारद श्री. रवीजी बेलपाठक यांच्या निवासस्थानी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पू. भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांना दैनिक सनातन प्रभातचा अंक भेट दिला. २६ मे या दिवशी वादळी वार्‍यासह पाऊस पडूनही ईश्‍वरी कृपेने २७ मे या दिवशी नांदेड येथील हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी पार पडली, हे दैनिक सनातन प्रभातमधील वृत्त समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *