Menu Close

रमझाननिमित्त रेल्वेकडून मुसलमान कर्मचार्‍यांना कामावरून लवकर घरी जाण्याची अनुमती

  • रमझान एक मास चालतो, म्हणजे एक मास ही सूट मिळणार; मात्र हिंदूंच्या  वर्षातील किती सणांच्या वेळी हिंदूंना अशा प्रकारची सूट दिली जाते ?
  • काँग्रेसच्या राज्यात अशी सूट दिली असती, तर त्यांचा लांगूलचालनाचा प्रयत्न आहे, हे लक्षात येते; मात्र भाजपच्या राज्यात असे का होत आहे ?

नवी देहली : रमझानमध्ये सूर्यास्ताला इफ्तारची वेळ चालू होते. त्यामुळे रेल्वेमध्ये असणार्‍या ज्या मुसलमान कर्मचार्‍यांचे घर कार्यालयापासून लांब आहे त्यांना, जेथे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे तेथे नियमित वेळेच्या आधी घरी जाण्याची अनुमती द्यावी, असा लेखी आदेश रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या कार्यालयांना दिला आहे. रेल्वेच्या सामान्य प्रशासनाचे संचालक पी.एस्. मीना यांनी हा आदेश दिला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *