Menu Close

बीड : हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी साहाय्य करण्याचे अधिवक्त्यांचे आश्‍वासन

बीड येथे महिला अधिवक्त्यांना निमंत्रण

अधिवक्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सौ. राजश्री तिवारी

बीड : येथील जिल्हा सत्र न्यायालयात महिला अधिवक्त्यांच्या बैठकीला १४ अधिवक्त्या उपस्थित होत्या. अधिवक्त्या सौ. गीता वझे आणि सौ. शहाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी ‘हिंदु धर्मजागृती सभेची आवश्यकता आणि धर्मकार्यात अधिवक्त्यांचे योगदान कसे आवश्यक आहे’, हे सांगून हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याविषयी अवगत केले. या वेळी २ अधिवक्त्यांनी हिंदू विधीज्ञ परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. सर्व अधिवक्त्यांनी सभेला उपस्थित रहाण्याचे आश्‍वासन दिले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *