Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा राजस्थानमध्ये धर्मप्रसार

आखाडा परिषदेचे प्रवक्ते श्री वैदेहीबलाभावाचार्यजी महाराज यांचे हिंदु जनजागृती समितीला आशीर्वाद

श्री वैदेहीबलाभावाचार्यजी महाराज यांना ग्रंथ भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (डावीकडे)

जोधपूर (राजस्थान) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी आखाडा परिषदेचे प्रवक्ते श्री वैदेहीबलाभावाचार्यजी महाराज यांची जोधपूर येथील त्यांच्या आश्रमात नुकतीच भेट घेतली. या वेळी त्यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात मी सदैव तुमच्या समवेत आहे’, असे आशीर्वाद दिले. स्वामीजींनी समितीच्या कार्याचे कौतुक केले, तसेच सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचा सन्मान केला. समितीच्या वतीने स्वामीजींना ‘धर्मशिक्षण फलक’, ‘लव्ह जिहाद’ हे ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, समितीचे श्री. आनंद जाखोटिया, सौ. राखी मोदी आदी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *