Menu Close

बडोदा येथे शिवजयंतीनिमित्त हिंदू एकता संघटनेच्या वतीने भव्य वाहन फेरी

हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

बडोदा, गुजरात : येथे हिंदू एकता संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहनफेरीत शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती समिती सहभागी झाली होती. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष श्री. राजन त्रिवेदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रीफळ वाढवून फेरीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्र्रम्’, ‘जय श्रीराम’ या घोषणांच्या नादात शहरातील मुख्य मार्गाने वाहनफेरी काढण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *