Menu Close

भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनातील विषय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे आश्‍वासन

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा करून प्रत्येक वेळी सहकार्याची भूमिका

आमदार सुजितसिंह ठाकूर (डावीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

तुळजापूर : ‘श्री तुळजाभवानी देवस्थानातील दानपेटी घोटाळ्याची सीआयडी चौकशी अहवाल त्वरित उघड करून सर्व दोषी व्यक्तींवर कठोर करावी. यासह अन्य एका प्रकरणात गुन्ह्याची शिक्षा भोगलेले श्याम मानव, तथा घोटाळ्यांचे आरोप सिद्ध झालेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील आणि अन्य लोकांची जादूटोणा कायद्याची शासकीय समिती (पीआयएम्सी) बरखास्त करावी’, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून विधान परिषदेचे भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांना देण्यात आले.

या वेळी सुजितसिंह ठाकूर म्हणाले, ‘‘वरील विषय पुढील मासात होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडतो. समितीचे कार्य चांगले असून माझे नेहमी सहकार्य असेल.’’ या वेळी सुजितसिंह ठाकूर यांना सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रणही देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *