Menu Close

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे निवेदन सादर

वर्धा : येथे १९ जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदनही देण्यात आले. निवेदनात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सर्वधर्मीय जनतेकडून कररूपी मिळालेल्या निधीच्या वापरावर निर्बंध घालावा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, हिंदूंच्या सणांच्या काळात केली जाणारी रेल्वे आणि बस यांची भाडेवाढ त्वरित रहित करावी, तसेच लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन राखण्यासाठी कायदा पारित करावा, या मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात राम मंदिर देवस्थानच्या वतीने श्री. संजीव हरदास हेही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *