Menu Close

युवतीचे धर्मांतर करण्यासाठीच विवाहाचे षड्यंत्र ! – युवतीच्या नातेवाइकांचा आरोप

लव्ह जिहाद नंतर आता ख्रिस्त्यांचीही हिंदु मुलींकडे वक्रदृष्टी !

विवाहित ख्रिस्ती युवकाकडून हिंदु युवतीशी विवाह

लखनौ (लक्ष्मणपुरी) : गोडा येथील एका विवाहित आशिष जोजेफ या ख्रिस्त्याने त्याच्या सहकारी हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. (लव्ह जिहाद नंतर आता ख्रिस्तीही हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करू लागल्यास हिंदूंना सावध होण्याची वेळ आली आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मुलीच्या भावाने सांगितले, २७ वर्षीय बहीण एका स्थानिक कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. १२ जानेवारीला ती शिकवणी वर्गाला गेली. तेव्हापासून ती परतली नाही. काही दिवसांनंतर आम्हाला कळले की, तिचा सहकारी शिक्षक आशिष जोजेफ याने तिच्याशी दुसरा विवाह करण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले आहे. त्यानंतर आशिष जोजेफ याने धर्मांतर केले आणि आशिष आर्य बनून तिच्याशी लखनौच्या अलीगंज येथील आर्य समाज मंदिरात विवाह केला, विवाह हे षड्यंत्र असून आशिष आणि त्याच्या सहकारी यांना युवतीचे धर्मांतर करायचे आहे, असा आरोपही युवतीच्या नातेवाइकांनी केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *