Menu Close

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या तरुणांकडून क्षमा 

छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या सतर्कतेचा परिणाम !

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये करणार्‍या चार तरुणांनी ५ जानेवारीला येथील महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून क्षमा मागितली.

१. ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद काळात घोषणाबाजी करतांना तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. याविषयी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. यासंदर्भात संघटनेची बैठक झाली.

२. ही बातमी कळताच प्रकरण चिघळण्याच्या भीतीने यातील काही तरुणांनी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन चूक मान्य असून आम्ही क्षमा मागायला सिद्ध आहोत, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *