Menu Close

धर्मांधांकडून रस्ता अडवून जैनमुनींना अश्‍लील शिवीगाळ !

दोन्ही काँग्रेसच्या लांगूलचालनामुळे उद्दाम झालेले धर्मांध !

कळमनुरी (जिल्हा यवतमाळ) : शहरात धर्मांधांनी जैन मुनी आणि जैन समाजाच्या कार्यकर्त्यांना अश्‍लील शिवीगाळ केली. जैन मुनी विशेषसागर महाराज हे शुद्धीसाठी जात होते. त्यांच्या समवेत भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल ओमप्रकाश मेणे होते. शुद्धीविधीनंतर जैन मुनी आणि कार्यकर्ते मंदिराकडे जात असतांना सार्वजनिक रस्त्यावर इम्तियाज कुतुब बागवान आणि हिराजी बागवानचा मुलगा यांसह अन्य धर्मांधांनी ‘येथून पुन्हा गेल्यास अंडी फेकून मारू’, असे म्हणत अश्‍लील शिवीगाळ केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. (केवळ शिवसेनाच अशा प्रसंगी नागरिकांच्या पाठिशी उभे रहाते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी दोघांसह इतर काही धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *