Menu Close

पुणे येथे ७ गोवंशियांना हत्येपासून जीवदान

पुणे : ७ गोवंशियांना भरून एक गाडी सारोळा मार्गे वीर गावाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यावर गोरक्षकांनी १६ डिसेंबरला सायंकाळी वीर चौक येथे सदर गाडी अडवून गायींना हत्येपासून वाचवले आणि जीवदान दिले. गाडीमध्ये ७ गोवंशियांना दाटीवाटीने आणि दोरीने करकचून बांधण्यात आले होते. या प्रकरणी सासवड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षा दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु युवा वाहिनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण केले. (गोवंश प्रतिबंधक कायदा असूनही राज्यात सर्रास होणार्‍या गोवंशियांच्या हत्येकडे सरकार का लक्ष देत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *