Menu Close

हिंदु राष्ट्राचे व्रत घ्या ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पुणे : ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे व्रत घेतले, तसे आता युवकांनी हिंदु राष्ट्राचे व्रत घ्या. ३२ मण सुवर्ण सिंहासनाच्या माध्यमातून संपूर्ण हिंदु समाज शिवछत्रपतींच्या पायाशी आणून हिंदु राष्ट्राच्या मार्गावर चालणारा करायचा आहे, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले. १२ नोव्हेंबरला धनकवडीतील दुर्वांकुर मंगल कार्यालयात पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी हिंदवी स्वराज्याचे ३२ मण सुवर्ण सिंहासन आणि शिवचरित्र या विषयावर मार्गदर्शन केले.

चीनच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार म्हणजेच टोकाचे देशप्रेम आणि तेच हिंदुत्व !

जेव्हा देशातील हिंदु समाजात धर्माविषयी टोकाचा अभिमान असेल, तेव्हा चीन आणि पाकिस्तान शिल्लक नसतील, असे प्रखर प्रतिपादन पू. भिडेगुरुजी यांनी केले. प्रेरणामंत्र म्हणून सभेची सांगता करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *