Menu Close

अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील गोळीबारात दोघांचा मृत्यू

न्यूयॉर्क : कोलोरॅडोमधील वॉलमार्ट दुकानात झालेल्या गोळीबारात २ जण ठार, तर १ महिला घायाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेकांची सुटका केली. हा गोळीबार नेमका कुणी आणि कोणत्या हेतूने केला, याविषयीची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेच्या आदल्याच दिवशी मॅनहॅटनमध्ये एका आतंकवाद्याने अल्लाह हू अकबर असे ओरडत लोकांच्या अंगावर ट्रक घालून ८ जणांना ठार केले होते. या पार्श्‍वभूमीवर वॉलमार्टमधील घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *