Menu Close

सावत्र बाप नमाज पठणाला बळजोरी करतो म्हणून मला त्याच्यासोबत ठेवू नका ! – १० वर्षीय मुलाची मागणी

धर्मांधांचे सत्य स्वरूप !

  • मध्यप्रदेशातील भाजपच्या राज्यात मुलांवर असे अत्याचार होणे, हे खेदजनक !
  • या मुलाची आर्तता पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधीही ऐकणार नाहीत; कारण ते अशा घटनांत बहिरे आणि आंधळे होतात !

भोपाळ : माझा सावत्र बाप मला नमाज पठण करायला सक्ती करतो. तसे न केल्यावर मारतो. मला त्याच्या सोबत पाठवले तर मी मरेन, अशी आर्त मागणी एका १० वर्षीय बालकाने पोलिसांकडे व्यक्त केली आहे.

मुलाने बाल कल्याण समितीला सांगितले की, त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने एका मुसलमानाशी लग्न केले आहे. त्याच्या सावत्र बापाने त्याला बळजोरीने नमाज आणि कलमा पठण करणे सक्तीचे केले. याविषयी मुलाला तिळमात्र आवड नाही. यामुळे त्याचा सावत्र बाप त्याला मारहाण करतो. मुलाची आईही त्याच्या सावत्र बापाला सहकार्य करून मुलाला मारहाण करते. बाल कल्याण समितीने दोन्ही पक्षांची तक्रारी ऐकून घेऊन मुलाला त्याच्या आजी-आजोबांच्या संरक्षणात पाठवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *