Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखा अभियान !

तासगाव आणि जत येथे निवेदन

सांगली : नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच आदर्श नवरात्रोत्सव होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तासगाव आणि जत येथे निवेदन देण्यात आले.

तासगाव येथे नायब तहसीलदार सुनील ढाणे, तसेच पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री पुरण मलमे, विलास पोळ, भाजप राज्य परिषद सदस्य श्री. विनायक खरमाटे उपस्थित होते.

जत येथे तहसील कार्यालय, तसेच पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजू ताशीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. नीला हत्ती, सौ. मंदा जिगजेणी, सौ. सावित्री स्वामी उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *