Menu Close

ठाणे येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने

जावेद हबीब यांच्या आस्थापनाने हिंदु देवतांचा अवमान केल्याचे प्रकरण

ठाणे : नावाजलेले केशभूषाकार जावेद हबीब यांच्या आस्थापनाच्या विज्ञापनात हिंदु देवतांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर (जिल्हा) भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने येथील घंटाळी मंदिरासमोर असलेल्या जावेद हबीबच्या आस्थापनाच्या फ्रेंचाइजी हेअर एक्सप्रेसो सलून  (केशकर्तनालयाच्या) समोर तीव्र निदर्शने करण्यात आली आणि सलून बंद करण्यास भाग पाडले. विज्ञापनाच्या माध्यमातून जावेद हबीब आस्थापनाने हिंदूंच्या भावना दुखावल्या असून या संदर्भात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र निषेध दर्शवला. भाजपचे स्थानिक नगरसेवक श्री. सुनेश जोशी, पक्षाचे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष श्री. राजेश मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमोचे शहर (जिल्हा) सचिव श्री. अर्पित माथुर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *