Menu Close

इसिसचा भारतातील आतंकवादी अबू युसूफ अल हिंदी सिरीयात ठार

दमास्कस (सिरीया) – इसिसमध्ये भारतीय मुसलमान युवकांना भरती करणारा मुळचा भारतातील आतंकवादी अबू युसूफ अल हिंदी हा सिरीयामध्ये ठार झाला आहे. अबू मूळचा कर्नाटकातील भटकळचा होता. अमेरिकेने अबूला जागतिक आतंकवादी घोषित केले होते. अबू छोटे मौला, अंजानभाई या नावानेही ओळखला जात होता.

भारतासह श्रीलंका आणि बांगलादेश येथील मुसलमान तरुणांना सामाजिक माध्यमांद्वारे त्यांचा ब्रेनवॉश करून त्यांना इसिसमध्ये भरती करण्याचे काम अबू करत होता. सिरीयात कुर्दीश सैनिकांसमवेत झालेल्या चकमकीत अबूला ठार करण्यात आले. इसिसने तो ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *