Menu Close

उल्हासनगर येथे दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

अल्पसंख्यांक म्हणून घेणारे गुन्हेगारीत मात्र पुढे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

उल्हासनगर : येथील दोन सख्ख्या बहिणींच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत धर्मांध जावेद खान (वय २२ वर्षे) याने त्यांच्यावर बलात्कार केला. त्याला कह्यात घेण्यात आले असून न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१. येथे एका ठिकाणी घरकाम करणार्‍या विवाहितेला तेथेच घरगडी म्हणून काम करणार्‍या जावेदने घर दाखवण्याच्या निमित्ताने दुसरीकडे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि याविषयी सांगितल्यास तुझी अपकीर्ती करून तुला ठार मारीन, अशी धमकीही दिली. त्याने वेळोवेळी तिला धाक दाखवून तिच्याकडून रोख रक्कम घेतली. मध्यंतरी तिच्या लहान बहिणीवरही त्याने बलात्कार केला. त्या वेळी भ्रमणभाषवर अश्‍लील छायाचित्रे काढली आणि ती दाखवून पैशांची मागणी केली.

२. दोन्ही बहिणींनी याविषयी पोलिसांना सांगितल्यावर त्यांनी वरील कारवाई केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *