Menu Close

काश्मिरी हिंदूंवरील प्रेमाने भारलेले ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ उद्बोधन सत्र !

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, श्री. राहुल राजदान आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी श्री. राजदान यांनी काश्मिरी वेश परिधान केला होता. त्यासमवेतच ‘दूध मांगोगे, तो खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे’, ‘हर हिंदू का नारा है, काश्मीर हमारा है’, यांसारख्या घोषणांनी वातावरण काश्मीरप्रतीच्या प्रेमामुळे भारून गेले.

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन

१. ‘पनून कश्मीर’ हा जिहादी आतंकवाद आणि विघटनवाद यांवर विजय मिळवण्याचा मंत्र ! – डॉ. अजय च्रोंगू, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘पनून काश्मीर’

२. केंद्रशासनाला ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘पनून कश्मीर’ यांना मान्यता द्यावीच लागेल ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

३. काश्मिरी हिंदूंना केंद्राचे अर्थसाहाय्य नको, न्याय्य अधिकार द्या ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

४. काश्मीर मधील जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी ‘पनून कश्मीर’ची निर्मिती आवश्यक ! – श्री. राहुल राजदान, ‘युथ फॉर पनून काश्मीर’

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्राच्या शेवटी पारित करण्यात आलेले ठराव !

१. केंद्रशासनाने ‘काश्मीरचे भारतातील विलीनीकरण कोणत्याही परिस्थितीत करणारच’, असे घोषित करावे.
२. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला ‘वंशविच्छेद’, तर काश्मिरी हिंदूंना ‘देशांतर्गत विस्थापित’ म्हणून घोषित करा.
३. काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेदा’विषयी हिंदूंना जलद न्याय मिळण्यासाठी न्यायालयीन प्रावधान करा.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *