गोव्यात श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सामाजिक माध्यमांत धर्मांध ख्रिस्त्यांनी आक्षेपार्ह टिपण्या केल्याचे प्रकरण

म्हापसा – भारतातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सामाजिक माध्यमांत अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि अपमानास्पद टिपण्या केल्याच्या प्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयित संतोष लमाणी या ख्रिस्ती पंथातील ‘प्रोटेस्टंट बिलिव्हर्स समाजातील व्यक्तीला कह्यात घेतले आहे. संशयित संतोष लमाणी हा मूळचा कर्नाटक येथील आहे आणि तो गेली काही वर्षे गोव्यात वास्को येथे वास्तव्यास आहे. संशयित संतोष लमाणी हा ‘प्रोटेस्टंट बिलिव्हर्स’ असल्याची प्राथमिक माहिती स्वामी समर्थ परिवार मठाच्या प्रतिनिधीने येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. या पत्रकार परिषदेत हणजूण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
Anjuna Police have arrested Santosh Lamani, a Vasco resident originally from Karnataka, for allegedly posting offensive content about Shri Swami Samarth on social media, reportedly hurting the religious sentiments of devotees. pic.twitter.com/vR13NkzUgt
— Prudent Media (@prudentgoa) August 5, 2026
शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनावरण करण्यात आले. ‘आमचे गोवा’या फेसबुक पानावर श्री स्वामी समर्थ यांच्या पुतळ्याविषयी माहिती प्रसारित करण्यात आली होती. या ‘पोस्ट’वर अनेक भाविकांनी श्रद्धा व्यक्त केली असतांना लमाणी याच्यासह मिलानी मास्कारेन्हस, पर्पेच्युओ अँथनी डिकॉस्टा, एडविन फर्नांडिस, रिचर्ड रॉड्रीगीज, सिरिल फर्नांडिस, बेनेथ अफोन्सो आणि जोकिम रॉड्रीगीज आदी काही धर्मांध ख्रिस्त्यांनी जाणीवपूर्वक, उपरोधिक आणि अपमानास्पद टिपण्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर ३० जुलै या दिवशी संबंधित व्यक्तींच्या विरोधात स्वामी समर्थ परिवार मठ, हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या होत्या आणि पोलिसांना संशयितांना कह्यात घेण्यासाठी ८ दिवसांचा अवधी दिला होता. हा अवधी संपण्यापूर्वीच हणजूण पोलिसांना कारवाई करत एका आरोपीस कह्यात घेतले आहे.
धार्मिक भावना दुखावणार्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !
संशयित आरोपीस कह्यात घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिवोली येथील श्री स्वामी समर्थ परिवार मठाचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘संशयिताला कह्यात घेतल्याने हणजूण पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अजूनही संशयितांना कह्यात घेण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या मुदतीच्या पूर्वीच संशयिताला कह्यात घेतले. धार्मिक भावना दुखावणार्या अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने यासंबंधी एक कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे.’’
फेसबुककडून पोलिसांनी मागितली माहिती ! – हणजूण पोलीस
पत्रकार परिषदेत उपस्थित पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘शिवोली येथील श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सामाजिक माध्यमांत आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या प्रकरणी आम्ही संबंधितांची माहिती ‘फेसबुक’कडून मागितली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस योग्य ती कारवाई करणार आहेत.’’
३१ ऑगस्ट
गोव्यात श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सामाजिक माध्यमांत धर्मांध ख्रिस्त्यांकडून आक्षेपार्ह टिपण्या
-
स्वामी समर्थ मठाकडून संबंधितांवर कारवाईची मागणी
-
हिंदू जनजागृती समितीद्वारे तक्रार दाखल

शिवोली – भारतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सामाजिक माध्यमांत अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि अपमानास्पद टिपण्या करणार्यांवर तात्काळ अन् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्वामी समर्थ मठाने केली आहे.
शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनावरण करण्यात आले. ‘आमचे गोवा’या फेसबुक पानावर श्री स्वामी समर्थ यांच्या पुतळ्याविषयी एक ‘पोस्ट’ प्रसिद्ध करण्यात आली होती. या ‘पोस्ट’वर अनेक भाविकांनी श्रद्धा व्यक्त केली असतांना काही धर्र्मांध ख्रिस्त्यांनी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह, उपरोधिक आणि अपमानास्पद टिपण्या केल्याचे समोर आले आहे.
Hindu Sentiments Hurt: Complaint Filed Over Alleged Insulting Comment Against Swami Samarth#Goa #Goanews #hinduSentimentshurt #insult #Comment #SwamiSamarth pic.twitter.com/IGShqvWw7d
— In Goa 24×7 (@InGoa24x7) July 30, 2026
या व्यक्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत मिलानी मस्कारेन्हस, पर्पेच्युओ अँथनी डिकॉस्टा, एडविन फर्नांडिस, रिचर्ड रॉड्रीगीज, सिरिल फर्नांडिस, बेनेथ अफोन्सो आणि जोकिम रॉड्रीगीज या व्यक्तींचा उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे लाखो स्वामीभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सर्व आक्षेपार्ह टिपण्यांचे स्क्रीनशॉट्स (लिखाणाची छायाचित्रे) पुराव्यादाखल पोलिसांकडे सादर करण्यात आली आहेत. कायद्याचे राज्य असलेल्या धर्मनिरपेक्ष समाजात पूजनीय संतांचा असा वारंवार होणारा अपमान सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत समितीने पोलिसांना या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन तात्काळ आणि कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे.







