काश्मीरमध्ये पुन्हा पहलगामसारखे आक्रमण !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरच्या कुलगाममध्ये २ जिहादी आतंकवाद्यांनी ३१ जुलैच्या रात्री वीटभट्टीवर काम करणार्या छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित हिंदु मजुरांना नाव विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसर्या मजुराचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. ही घटना कुलगामपासून २० किलोमीटर दूर असलेल्या केलाम येथे घडली. मृत तरुणांची नावे २४ वर्षीय दीपक रात्रे आणि २८ वर्षीय भूपेंद्र अशी आहेत. या घटनेनंतर सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. हे आतंकवादी एका मोटार सायकलवरून येथे आले होते. एकाकडे एके-४७ रायफल आणि दुसर्याकडे पिस्तूल होती. आक्रमण केल्यानंतर ते येथून पळून केले. या दोघांपैकी एकाने काही दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी अनंतनाग येथे तैनात असणार्या पोलिसांवर गोळीबार करून एका पोलिसाची हत्या केली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
“पहले नाम पूछा, फिर 2 हिंदुओं को अलग कर मार दी गोली”
कश्मीर के कुलगाम में पहलगाम जैसा आतंकी हमला।
धर्म जानने के बाद Lashkar-e-Taiba ने बनाया निशाना
1 – दीपक कुमार
2 – भूपिंदर कुमारदोनों हिंदू प्रवासी मजदूर छत्तीसगढ़ के निवासी। pic.twitter.com/2xaXyMk5Qv
— Sagar Kumar “Sudarshan News” (@KumaarSaagar) August 1, 2026
केवळ हिंदु मजुरांना वेगळे करून केले ठार
पोलिसांच्या माहितीनुसार हे आक्रमण ज्याज्याप्रकारे पहलगाम येथे हिंदूंना नाव विचारून इतरांपासून वेगळे करून त्यांना ठार मारण्यात आले त्याप्रकारे आतंकवाद्यांनी आधी स्थलांतरित मजुरांची नावे विचारली. त्यानंतर २ हिंदूंना गटातून वेगळे करून त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या वेळी तिथे अनेक स्थलांतरित मजूर उपस्थित होते; पण त्यांपैकी केवळ दोघेच हिंदू होते. आतंकवाद्यांनी आधी माहिती काढली आणि नंतर येथे आक्रमण केले, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
आक्रमणामागे पुन्हा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’
सूत्रांच्या माहितीनुसार या आक्रमणात एक स्थानिक आणि एक परदेशी आतंकवादी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक अन्वेषणाचे लक्ष महंमद लतीफ याच्यावर आहे. तो गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या गटामध्ये सहभागी झाला होता. पहलगाम येथील आक्रमण याच गटाकडून करण्यात आले होते.
राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे साहाय्य
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेनंतर मृत हिंदूंच्या कुटुंबांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचे सानुग्रह साहाय्य देण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार अब्दुल्ला यांनी या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला आहे आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांबद्दल सहवेदना व्यक्त करत म्हटले की, या कठीण काळात सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
स्रोत : मराठी सनातन प्रभात







