Menu Close

नेपाल हिंसा: आतापर्यंत ३ हिंदूंचा मृत्यू ,नेपाळमधील भारताच्या सीमेला लागून असलेल्या ६ जिल्ह्यांत संचारबंदी

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात कावड यात्रेच्या वेळी भोंग्यांच्या आवाजावरून काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणानंतर झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला. यात आतापर्यंत ओमप्रकाश मेहता आणि १५ वर्षीय गणेश यादव यांच्यासह ३ हिंदूंचा मृत्यू झाला. ही दंगल अद्याप शमलेली नसून ती मधेश प्रांतातील सिरहा, धनुषा, पर्सा, सप्तरी आणि बीरगंज या जिल्ह्यांपर्यंत पसरली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नेपाळ प्रशासनाने बाधित भागांत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली असून नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ सैन्य यांना सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. पंतप्रधान बालेन शहा यांनी देशाला संबोधित करत शांतता आणि धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन केले असून घटनेच्या निष्पक्ष अन्वेषणासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सीमेवरील जिल्ह्यांत कडेकोट बंदोबस्त

भारत-नेपाळ सीमेला (विशेषतः बिहार राज्याला) लागून असलेले सुनसरी, पर्सा, धनुषा आणि सिरहा हे जिल्हे व्यापारी दृष्टीने संवेदनशील मानले जातात. जनकपूरधम, गोलबाजार, लहान, बीरगंज, राजविराज आणि बोदे बर्साइन या संवेदनशील भागांमध्ये नागरिकांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. संचारबंदी आणि मुख्य रस्ते बंद असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारत-नेपाळ सीमा मार्गावर अत्यंत कडकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील भागांत सैन्याकडून ध्वजसंचलन आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई देखरेख केली जात आहे.

बालेन शहा सरकारवर टीका

या भीषण हिंसाचारानंतर नेपाळमधील बालेन शहा सरकारवर तीव्र टीका होत आहे. वेळीच राजकीय आणि प्रशासकीय पावले न उचलल्यामुळेच ही हिंसा ६ शहरांमध्ये पसरल्याचा आरोप माजी पंतप्रधान पुष्पकमल दहाल आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांनी  केला आहे.

हिंदूंकडून मृतांना ‘हुतात्मा’ दर्जा देण्याची मागणी

देवानगंज ग्रामीण नगरपालिकेने पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्या स्थानिकांना स्थानिक पातळीवर ‘हुतात्मा’ घोषित केले असून नेपाळ सरकारकडे त्यांना अधिकृत हुतात्मा दर्जा आणि प्रत्येकी १० लाख लाख रुपयांच्या साहाय्याची मागणी केली आहे.


28 जुलै

नेपाल हिंसा: नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण, पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील भारताला लागून असलेल्या सुनसरी जिल्ह्यात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले. दंगलीनंतर प्रशासनाने काही भागांत अनिश्चित काळासाठी निर्बंध लादले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जुलैच्या रात्री देवगंज ग्रामीण नगरपालिकेच्या कप्तानगंज भागात हिंदू आणि मुसलमान यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. या वेळी भोंग्यांचा वापर आणि धार्मिक ध्वज लावणे यांवरून वाद चालू झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतांना सुरक्षादलांनी गोळीबार केला. यामध्ये २४ वर्षांचे ओम प्रकाश मेहता ठार झाले.

सुनसरी जिल्हा नेपाळच्या आग्नेय भागात वसलेले आहे, तसेच हा भाग भारताच्या बिहार राज्याच्या जवळ आहे. हा भाग दोन्ही देशांमधील एक महत्त्वाचा व्यावसायिक, तसेच वाहतूक मार्ग आहे.

स्रोत : मराठी सनातन प्रभात

Latest News