Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तन-मन-धन समर्पित करा !

हिंदु जनजागृती समिती आयोजित सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला आलेल्या धर्मविरांनो, हिंदु समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाचा आणि कल्याणाचा एकमात्र उपाय म्हणजे भारतात हिंदु राष्ट्र प्रस्थापित करणे. दिवसेंदिवस हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी काळ अनुकूल होत आहे. आज ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दावर सर्वत्र चर्चा होऊ लागल्या आहेत. आता आपल्याला केवळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करायची नाही, तर प्रत्यक्ष कार्य करायचे आहे. धर्माधिष्ठित हिंदु राज्यसत्तेचे शिवधनुष्य बाहुबलावर उचलण्याचे धैर्य दाखवायचे आहे. यासाठी आपली मातृभूमी आपले समर्पण मागत आहे.

सध्याच्या संक्रमणकाळात आणि येत्या २ – ३ वर्षांनी आरंभ होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या काळात आपल्या सर्वांना हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेचे कार्य अथक करावे लागणार आहे. आता वेळ अत्यल्प आहे. यासाठी दृढ निश्‍चय करून हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कृतीशील व्हा आणि या कार्यासाठी तन-मन-धन समर्पित करा ! हिंदु राष्ट्राची स्थापना हेच यापुढे आपल्या सर्वांचे ध्येय बनले, तर हिंदु राष्ट्राची पहाट उगवल्याविना रहाणार नाही !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *