Menu Close

सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरांकडून गोवा येथील सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला शुभेच्छा !

संस्कृतीची जपणूक करणाऱ्यां हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची प्रशंसा

डावीकडून सौ. अनिता बुणगे, सत्कार करतांना उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल, सत्कार स्वीकारतांना श्री. राजन बुणगे, श्री. हिरालाल तिवारी आणि श्री. बापू ढगे

सोलापूर : आजच्या काळात सत्य लिहिणे आणि सांगणे कोणालाही शक्य नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संस्कृतीची जपणूक करत आहेत. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी सर्वांना शुभेच्छा !, असे उद्गार येथील महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांनी काढले. समाजसेवक श्री. बापू ढगे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समनव्यक श्री. राजन बुणगे, श्री. हिरालाल तिवारी आणि सौ. अनिता बुणगे यांनी त्यांची सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्या बोलत होत्या. समितीच्या कार्यास तत्पर असणारे श्री. बापू ढगे यांचेही त्यांनी या वेळी कौतुक केले. या वेळी श्री. बुणगे यांनी समितीचे कार्य आणि अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यांची माहिती दिली. समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उपमहापौरांनी कार्यकर्त्यांचा सत्कार केला. रणरागिणी शाखेविषयी माहिती दिल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या महिलांच्या कार्यक्रमाला तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी बोलवू. एवढा त्याग कोठेही पहावयास मिळत नाही.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *