Menu Close

बेंगळुरू येथे भाजप नेत्याची हत्या

बेंगळुरू : येथील अनेकल परिसरात ३१ मेच्या दिवशी सकाळी अज्ञातांनी भाजप अनुसूचित जाती-जमाती युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हरिश यांची हत्या केली. ते सकाळी मित्रांना एका रेस्टॉरंटमध्ये भेटून परतत असतांना दुचाकीवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी हरिश यांच्या डोळ्यांत तिखट घालून त्यांच्यावर वार केले. पोलिसांनी या हत्येमागे वैयक्तिक वादाची पार्श्वंभूमी असल्याचे म्हटले आहे; परंतु हरिश यांच्या नातेवाइकांनी ही हत्या राजकीय हेतूने झाल्याचे सांगत विरोधी पक्षाचा यामागे हात असल्याचा आरोप केला आहे. (काँग्रेसच्या राज्यात भाजप नेत्यांची हत्या होते, यावर पुरोगामी, कम्युनिस्ट काहीच बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on भाजपा

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *