Menu Close

पुणे शहरात होणार्‍या हिंदु ऐक्य दिंडीत १०० हून अधिक वारकरी सहभागी होणार !

सोहळ्यात उपस्थित वारकरी

पुणे : येथील कर्वेनगर भागात रहाणारे दैनिक सनातन प्रभातचे वाचक ह.भ.प. वांजळे महाराज यांच्या घरी श्री विठ्ठलाला चंदनाची उटी लावण्याचा सोहळा होता. त्या वेळी १०० हून अधिक वारकरी तिथे जमले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वश्री मनोज महाजन आणि मंदार भोपळे हेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळा झाल्यानंतर श्री. मनोज महाजन यांनी सर्वांना ‘१४ मे या दिवशी होणार्‍या हिंदु ऐक्य दिंडीत सहभागी व्हा !’, असे आवाहन केले. या वेळी ह.भ.प. वांजळे महाराज यांनी ‘सर्व वारकरी हिंदु ऐक्य दिंडीला येतील’, असे सांगितले आणि श्री. मनोज महाजन यांचा शाल अन् श्रीफळ देऊन सत्कार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *