Menu Close

शिवजयंतीनिमित्त तवंदी (जिल्हा बेळगाव) येथे कार्यक्रम

तवंदी (जिल्हा बेळगाव) : येथे २९ एप्रिलला राजे ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवकालीन स्थिती, शिवरायांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य, आताची स्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला १६ माजी सैनिकांसह ५० जिज्ञासू उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. अलका पाटील यांनी महिलांची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाय या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जुगल वैष्णव यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. राजेंद्र गुरव यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठ श्री. स्वरूप करपे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *