Menu Close

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचे कौतुक केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. भारताची गेल्या काही दिवसांतील प्रगती वाखाणण्याजोगी आहे, पण भारताबद्दल कोणी जास्त बोलताना दिसत नाही, असा त्यांचा सूर होता.

‘भारत चांगले काम करत आहे. त्यांना चांगले यश मिळत आहे. मात्र, त्यांच्या चांगल्या कामगिरीविषयी कुणीही बोलत नाही. याआधी चीनविषयी सर्व जण बोलत होते. त्यांच्या कामगिरीची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, आता भारताने चांगली सुरूवात केली आहे’ असे त्यांनी म्हटले.

यापूर्वीही भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

डोनाल्ड ट्रम्प हे चीन आणि मॅक्सिकोच्या नागरिकांचं अमेरिकेत स्थलांतरीत होण्यावर बऱ्याचदा बोलताना दिसतात. पण, त्यांनी भारताविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, त्यांच्या प्रचारादरम्यान ओबामांच्या काळात अमेरिकेचे जागतिक महासत्ता असणारे स्थान घसरल्याचीही टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

स्त्रोत : जी २४ तास

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *