Menu Close

हिंदु धर्मावर टीका : हिंदु अमेरिकन फाऊंडेशनकडून सीएन्एन् वाहिनीचा निषेध

वॉशिंग्टन (अमेरिका) : येथील सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला. हिंदु धर्माच्या विरोधातील या कार्यक्रमाचे पुन्हा प्रक्षेपण करू नयेे, यासाठी येथील हिंदूंनी ६ एप्रिल या दिवशी सीएन्एन् वाहिनीला संपर्क करून निषेध केला.

रझा अस्लान यांच्या प्रक्षोभक आणि अयोग्य वर्तनाविषयी येथील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, नेते यांनी सीएन्एन् वाहिनीला कळवले असूनही वाहिनीने क्षमा मागण्यास नकार दिला. त्यामुळे सीएन्एन् वाहिनीने या कार्यक्रमाचे पुनर्प्रक्षेपण करू नये, अशी मागणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशन आणि अमेरिकेतील हिंदू यांनी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *