Menu Close

काही झाले तरी राम मंदिर अयोध्येतच होणार : विनय कटियार

अयोध्या : भाजपचे वरिष्ठ नेते विनय कटियार यांनी वेळ प्रसंगी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अयोध्येत भव्य राम मंदिर निश्चित होणार असल्याचे म्हटले आहे. हा भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचेही ते म्हणाले. अयोध्येत मंगळवारी रामकोट परिक्रमा करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

विनय कटियार यावेळी म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर बांधणारच. बाबरच्या नावाने मस्जिद किंवा कोणत्याही प्रकारचे स्मारक आम्ही कदापी स्वीकारणार नाही. बाबरच्या नावाने मस्जिद निर्माणाच्या गप्पा मारणारे, हट्टी आहेत. बाबर या देशाचा महापुरूष होऊच शकत नाही. तो केवळ एक लुटारूच होता. आपल्यातील काही बाबरच्या नावाने मस्जिद बनावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र असे होणे योग्य नाही, असेही कटियार म्हणाले.

संदर्भ : माझा पेपर

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *