Menu Close

बलुचिस्तानमध्ये हिंदु महिलेची कुर्‍हाडीचा वार करून हत्या

पाकमधील वंशसंहाराला सामोरे जात असलेले हिंदू ! भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणार्‍या भारतीय शासनकर्त्यांकडून पाक, अमेरिका येथील हिंदूंच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नसीराबाद : बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यात एका हिंदु महिलेची अज्ञातांकडून कुर्‍हाडीचा वार करून हत्या करण्यात आली. जानिया कुमारी असे या महिलेचे नाव होते. जानिया कुमारी हिचा भाऊ राम याने पत्रकारांना सांगितले की, येथील प्रभावशाली लोकांकडून विनाकारण माझ्या बहिणीची हत्या करण्यात आली आहे. राम यांनी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *