Menu Close

हिंदु जनजागृती समिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरवेल ! – पू. कुंभार महाराज

पू. कुंभार महाराज यांना दैनिक सनातन प्रभातचा अंक भेट देतांना समितीचे श्री. हेमंत सोनवणे आणि शेजारी अधिवक्ता गोविंद गांधी

सातारा :  स्वा. सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या घरादाराची राखरांगोळी केली; मात्र त्यांच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आली. हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उभारलेली चळवळ प्रेरणादायी असून तिला ईश्वरी अधिष्ठान आहे. समिती निश्चितच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्वप्न सत्यात उतरवेल, यात शंका नाही, असे गौरवोद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हेमंत सोनवणे यांनी पू. कुंभार महाराज यांना दैनिक सनातन प्रभातचा अंक भेट देऊन त्यांचे कार्यासाठी शुभाशीर्वाद घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *