Menu Close

वेल्लोर : १५ ख्रिश्चनांची समारंभपूर्वक ‘घरवापसी’

ghar_wapsi

वेल्लोर : येथील पाच कुटुंबांतील १५ ख्रिश्चनांची हिंदू धर्मात ‘घर वापसी‘ करण्यात आली. लातेरी, काटपडी येथे एका आयोजित समारंभात धर्मपरिवर्तन करून या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यात आले.

हिंदू मुन्नानी या संघटनेतर्फे चेंगीमोत्तूर येथे अम्मान मंदिरात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. लातेरीनजीक चेंगीमोत्तूर येथील अडी द्रविडार कॉलनी येथील ते रहिवासी आहेत.

“वेल्लोर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला ‘घरवापसी‘चा हा पहिलाच समारंभ आहे. या लोकांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या समारंभात त्यांचे पुन्हा धर्मांतर करून त्यांना हिंदू धर्मात आणण्यात आले,” असे हिंदू मुन्नानीचे प्रांत अध्यक्ष के. मंगेश यांनी सांगितले.

संदर्भ : सकाळ

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *