Menu Close

व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्हॅलेंटाईन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी !

व्हॅलेंटाईन यांच्या पुतळ्याला फाशी देतांना कार्यकर्ते

नंदुरबार :  व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याने अनैतिकता वाढत असल्याने व्हॅलेंटाईन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. येथे १३ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आले. प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध नोंदवला.

या वेळी समितीच्या भावना कदम आणि श्री. मयूर चौधरी यांनीही मत व्यक्त केले. महाराणा प्रताप युवा मंच, श्री शिवप्रतिष्ठान, श्रीराम गृप, रोकडेश्वतर व्यायामशाळा, रणरागिणी शाखा या संघटनांचे कार्यकर्ते, तसेच सर्वश्री जितेंद्र राजपूत, दीपक गवळी, गौरव चौधरी, दीपक शिंदे, मुकेश राजपूत, तसेच सुभाष चौक रिक्क्षा चालक संघटना आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *