Menu Close

न्याय न मिळाल्यास हलाला पीडित मुसलमान महिलेची हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी !

गाजियाबाद : हलाला पीडित (पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा त्याच्याशीच विवाह करण्यासाठी दुसर्‍या पुरुषाशी विवाह करून त्याच्याकडून घटस्फोट घेणे) मुसलमान महिलेने न्याय न मिळाल्यास हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी दिली आहे. हलालामुळे पीडितेने पहिल्या पतीकडून घटस्फोट घेऊन दुसरा निकाह केला होता; मात्र दुसर्‍या पतीने अन्य युवतीशी विवाह केला आणि तो सवा वर्षापासून फरार आहे. या पीडित महिलेला पहिल्या पतीपासून २ आणि दुसर्‍या पतीपासून १ अशी ३ अपत्ये आहेत. दुसरा पती नांदवत नाही अन् घटस्फोटही देत नाही. यासंदर्भात महिलेने तिच्या समाजातील लोकांनी साहाय्य न केल्यास हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी दिली आहे.

या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी जय शिवसेना संघटनेने पुढाकार घेतला आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आर्यन यांनी पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटणार असल्याचे, तसेच प्रसंगी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *