Menu Close

तुळजापूर तहसीलदारांकडून पोलीस आणि प्रशासन यांना राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी तत्परतेने कारवाई करण्याचे आदेश !

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

  • हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा चळवळ !

rashtradhwaj1तुळजापूर : येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने २६ जानेवारीच्या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांना देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर तहसीलदार श्री. पाटील यांनी तातडीने कारवाई करत पोलीस ठाणी, शाळा, महाविद्यालये, शिक्षणाधिकारी आणि नगरपालिका यांना आदेश काढण्यास सांगितले. (राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी एवढ्या तत्परतेने आदेश देणारे तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हे निवेदन देतांना समितीच्या वतीने सर्वश्री कदम, विनायक माळी, सचिन काबंळे, तानाजी धनके, बालाजी बेले, आकाश म्हेत्रे, महेश लोहार, राजेंद्र लोहार, धनजंय बगडी, सौ. पुनाताई होरडे यांसह १५ धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *