Menu Close

सबनीसांच्या पुतळ्याची भाजपने काढली धिंड


पिंपरी (पुणे) : पिंपरीत होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढून भाजपने शुक्रवारी सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी या वेळी सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष सदाशिव खाडे, उमा खापरे, माउली थोरात यांनी भाग घेतला. महेशनगर ते एच. ए. मैदानावरील साहित्य संमेलनाच्या स्थळापर्यंत धिंड काढण्यात आली.

साबळे म्हणाले, ‘डॉ. सबनीस हे स्वतः गाढव आहेत. त्यांना विवेक नाही. हा आमचा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्यात आम्ही सबनीस यांच्या प्रतिकृतीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार आहोत. यापूर्वी, महाबळेश्वर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव यांच्यावर आक्षेप घेण्यात आले. त्या वेळी त्यांनी स्वतः अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षाविनाही संमेलन झाले होते. आताही अध्यक्षाविना संमेलन व्हावे किंवा सबनीस यांनी माफी मागावी.’

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *