Menu Close

संयुक्त राष्ट्र संघात प्रथमच दिवाळी !

न्यूयार्क : दिवाळीचा सण या वेळी प्रथमच संयुक्त राष्ट्रात साजरा करण्यात येतोय. संयुक्त राष्ट्रात साजरी होणारी ही पहिलीच दिवाळी आहे.

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याठिकाणी पणतीसह हॅप्पी दिवाळी असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातही दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय.

संयुक्त राष्ट्रसंघात दिवाळी साजरी करण्याच्या निर्णयाचे भारताकडूनही स्वागत करण्यात आले. संयुक्त राष्ट्रातील भारताचे अॅम्बेसेडर सय्यद अकबरुद्दीन यांनी या निर्णयाबद्दल ट्विटरवरुन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांचे आभार मानले.

un_happy_diwali
संदर्भ : एबीपी माझा

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *