Menu Close

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

dombivli_rashtradwaj_nivedan
जोंधळे विद्यालयाच्या मुख्याध्यापक सौ. खुळेबाई (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

ठाणे : राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात यावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. या शाळांमध्ये चारुबामा शाळा, किडलॅण्ड हायस्कूल, प्रगती महाविद्यालय, टिळक शाळा, जोंधळे विद्यालय यांचा समावेश आहे.

या वेळी डोंबिवली पश्‍चिम येथील जोंधळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. खुळे यांनी समितीचा हा उपक्रम अतिशय चांगला असून २ वर्षांपूर्वी समितीने या संदर्भातील विषय मांडल्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर पडलेले प्लास्टिकचे ध्वज गोळा केले होते, असे सांगितले.

क्षणचित्र : डोंबिवली पश्‍चिम येथील सनातन प्रभातचे वाचक श्री. प्रकाश झरकर हे आजारी असतांना ही ते निवेदन देण्यास आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *