Menu Close

हातकणंगले (कोल्हापूर): ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांत पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप

  • हातकणंगले येथे सकल हिंदु समाजाच्या पत्रकार परिषदेत आरोप

  • पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास प्रसंगी ‘चौरंगा’ करण्याची चेतावणी !

  • मराठा समाजाविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

पत्रकार परिषेदत डावीकडून श्री. निरंजन शिंदे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. दीपक काटे, श्री. प्रकाश बेलवाडे, श्री. धवलसिंह मोहिते-पाटील, श्री. संताजी बाबा-घोरपडे आणि श्री. व्यंकटेश मोटे

कोल्हापूर – हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात आरोपींची गुन्हेगारी मानसिकता स्पष्ट दिसत असतांना पोलिसांनी ‘हेट क्राईम’ (घृणा अपराध) आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचे कडक कायदेशीर कलम लावण्याऐवजी उलटपक्षी धार्मिक भावना दुखावल्याचे कलम वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला. पोलिसांची ही भूमिका आरोपींना पाठीशी घालणारी आणि संशयास्पद आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शाहीद सनदे आणि शाहरूख देसाई यांच्यातील ‘मराठा समाजातील एकाही मुलीला’ सोडायचे नाही’, अशा प्रकारचे संभाषण उपलब्ध असतांना त्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरी हातकणंगले येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील अन्वेषणात पोलीस प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असून न्याय न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या न्यायाप्रमाणे प्रसंगी ‘चौरंगा’ करण्यात येईल, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

या प्रसंगी अकलूज येथील सहकार क्षेत्रातील नेते श्री. धवलसिंह मोहिते-पाटील, ‘गर्जना संघटने’चे श्री. प्रकाश बेलवाडे, ‘व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. संताजी बाबा-घाेरपडे, नाशिक येथील श्री. व्यंकटेश मोटे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. दीपक काटे, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आलेली प्रमुख सूत्रे

१. हा केवळ एका मुलीवर झालेला वैयक्तिक अत्याचार नसून मराठा समाजाच्या युवती-मुली यांच्यावर अत्याचार करून मराठा समाजाची अस्मिता पायदळी तुडवण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा पूर्वमनियोजित कट दिसून येतो.

२. पीडित तरुणीची छायाचित्रे, तसेच ध्वनीचित्रीकरण अन्वेषणाच्या कालावधीत कायद्यानुसार अनिवार्य असलेल्या महिला पंचांना समवेत घेतले गेले नाही.

३. आरोपींच्या भ्रमणभाषमधील पुसून टाकलेली छायाचित्रे, ध्वनीचित्रीकरण, तसेच संभाषण परत मिळवण्याचा प्रयत्न करता पोलिसांनी सामाजिक माध्यमांवरील ‘अकाऊंट’ (खाते) बंद करण्याची विनंती संबंधित आस्थापनास केली.

४. ज्या ‘लॉज’वर अत्याचार घडला, तेथील कर्मचार्‍यांसमोर आरोपींची कायदेशीर ‘ओळख परेड’ घेण्यात आली नाही.

५. बलात्कार आणि मानसिक छळ यांच्या पुराव्यांवर भर देण्याऐवजी पोलिसांनी बिनमहत्त्वाच्या गोष्टींचे पुरावे गोळा करण्यात वेळ घालवला.

सकल हिंदु समाजाच्या मागण्या

  • सर्व आरोपींवर तात्काळ ‘मकोका’अंतर्गत कारवाई करावी.
  • भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १७३(८) नुसार सर्व ‘डिजिटल’ आणि सामाजिक पुराव्यांसह तात्काळ ‘पूरक दोषारोपपत्र’ प्रविष्ट करण्यात यावे.
  • अन्वेषणात पळवाटा ठेवून आरोपींना जामीन मिळण्यास साहाय्य करणार्‍या संबंधित अन्वेषण अधिकार्‍यांचे तात्काळ निलंबन करून खातेनिहाय चौकशी व्हावी.
Read more on Hindu Organisations

Latest News