
मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा सोहळा’ उत्साहात साजरा करण्यात आला. आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता हिंदूंनी यंत्रांवरील अवलंबित्व न्यून करून प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण यांचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. या महोत्सवात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि साधनेची दिशा’ यावर वक्त्यांनी ओजस्वी वाणीत विचार मांडले.




या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, धर्मरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, ‘समिती’चे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट दाखवण्यात आला. या महोत्सवात धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार करण्यात आले.
🚩 सातारा येथे @HinduJagrutiOrg आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
७०० हून धर्माभिमानी हिंदूंनी सहभाग घेत भारताला रामराज्यरूपी हिंदू राष्ट्र बनविण्याचा दृढ संकल्प !#GuruShishyaParampara #gurupournima2026#satara pic.twitter.com/TV9jLTjFQS
— Hemant Sonavane (@hemant_hjs) July 29, 2026
हिंदूंनी ‘स्वबोध’ आणि ‘शत्रूबोध’ जागृत ठेवून धर्मरक्षणासाठी संघटित व्हावे ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आज धर्मावर होणारे आघात केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते आपल्या उंबरठ्याच्या आत पोचले आहेत. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘वक्फ बोर्डाचे अतिक्रमण’ आणि अलीकडेच उघडकीस आलेला ‘कॉर्पोरेट जिहाद’ यांसारख्या माध्यमातून हिंदूंना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. जोपर्यंत हिंदु समाज ‘स्वबोध’ (सामर्थ्य आणि धर्मज्ञान) आणि ‘शत्रूबोध’ (शत्रूची छूपी रणनीती) यांचा बोध करून घेत नाही, तोपर्यंत या आघातांचा प्रतिकार शक्य नाही. हिंदूंनी आता केवळ बघ्याची भूमिका न घेता धर्मरक्षणासाठी कृतीशील व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये करण्यात आले.







