Menu Close

ताजमहाल: अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून उत्तर मागितले

ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याचे प्रकरण

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ताजमहाल हे तेजोमहालय मंदिर असल्याचा दावा करणार्‍या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने ६ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांना त्यांचे उत्तर देण्याचा आदेश दिला आहे.

ही याचिका ‘अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान’ यांच्यावतीने ज्येष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांच्यासह ५ जणांकडून प्रविष्ट करण्यात आली आहे. यात ‘ताजमहाल परिसराच्या आत ‘अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजोमहालय मंदिर’ आहे’, अशी घोषणा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘अधिवक्ता आयुक्त नियुक्त’ करण्याची मागणी

सुनावणीच्या वेळी अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी युक्तीवाद केला की, या परिसराचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढण्यासाठी आणि एक अधिवक्ता आयुक्त नियुक्त करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करण्यात आला होता; परंतु कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा हा अर्ज चुकीच्या पद्धतीने फेटाळला. यानंतर त्यांची पुनर्विचार याचिकाही सुनावणी योग्य न मानत फेटाळण्यात आली. या संपूर्ण विवादाच्या योग्य निवारणासाठी परिसराचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

वर्ष २०१५ पासून मुख्य प्रकरण प्रलंबित

ताजमहालाच्या संदर्भात वर्ष २०१५ मध्ये एक खटला प्रविष्ट करण्यात आला होता, जो अजूनही आगर्‍याच्या दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्यात ताजमहालच्या परिसरात अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महालयचे मंदिर असल्याचे घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा खटला प्रलंबित असतांनाच अधिवक्ता आयुक्त नियुक्त करण्याचा अर्ज करण्यात आला होता, जो दोन्ही जिल्हा न्यायालयांनी फेटाळला होता.


६ जुलै

ताजमहाल हा ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर हिंदूंनी प्रयागराज (इलाहाबाद) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

१०९ ऐतिहासिक व पुरातात्विक पुराव्यांचा दावा

प्रयागराज (उत्तर प्रदेश) – येथील ‘ताजमहल’ हे ‘तेजोमहालय’ आहे, हे निश्चित करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका ‘भगवान श्री अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान’ यांच्या वतीने अधिवक्ता पू. हरि शंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांच्यासह ५ व्यक्तींनी सादर केली आहे. अधिवक्ता पू. हरि शंकर जैन हे वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणातही हिंदूंच्या बाजूने न्यायालयीन लढा देत आहेत.

पू. हरि शंकर जैन

१. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ‘ताजमहल’ हे भगवान शिवाला समर्पित ‘तेजोमहालय’ असल्याचे १०९ हिंदू पुरावे/प्रतीके देखील सादर केली आहेत. या याचिकेद्वारे आग्रा जिल्हा न्यायालयाच्या जुन्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. त्या आदेशात ताजमहालमधील हिंदू प्रतीकांच्या पडताळणीसाठी सर्वेक्षण करण्यास नकार देण्यात आला होता.

२. हे प्रकरण वर्ष २०१५ मध्ये सुरू झाले होते. त्या वेळी आग्रा येथील दिवाणी न्यायालयात एक दिवाणी दावा दाखल करण्यात आला होता. त्याद्वारे असा दावा करण्यात आला होता की, ताजमहाल परिसर प्रत्यक्षात तेजोमहालय, म्हणजेच तेजोलिंग महादेव मंदिर आहे, जिथे भगवान महादेव नागनाथेश्वर विराजमान आहेत. यासोबतच हिंदूंना ताजमहालमध्ये पूजा करण्याची परवानगी देण्याचीही मागणी करण्यात आली होती.

३. यानंतर पुन्हा वर्ष २०१९ मध्ये याचिकाकर्त्यांनी अर्ज सादर करून ताजमहालची पाहणी करण्यासाठी आणि त्याच्या रचनेचे छायाचित्र (फोटो) व चलचित्र (व्हिडिओ) बनवण्यासाठी ‘अधिवक्ता आयुक्त’ (ॲडव्होकेट कमिशनर) नियुक्त करण्याची मागणी केली होती. तथापि, याचिकाकर्ते ताजमहालची ओळख सिद्ध करणारे महसूल अभिलेख (महसुली कागदपत्रे/रेव्हेन्यू रेकॉर्ड्स) सादर करण्यात असमर्थ राहिले, असे सांगत न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली होती.

Latest News